top of page

आवाहन... नूतनीकरणाचे

नुतन वर्षं 2026 च्या सर्व बंधू - भगिनींना खूप-खूप शुभेच्छा ...सरत्या वर्षाला निरोप देत 2026 स्वागत आपण जून्या कडू-गोड आठवणी सोबतीला घेउन केले आहे. ऑर्गनायझेशन फाॅर राइट्स ऑफ ट्रायबल (आफ्रोट) संघटनेच्या वाटचालीत आणि जडणघडणीत आपला अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा वाटा संघटनेला एक वेगळी ओळख आणि आदिवासींच्या सामाजिक प्रश्नावर थोडफार लढण्यासाठी स्फुल्लिंग निर्माण करणारा राहिला आहे. आदिवासींच्या आरक्षणविषयक चुकीच्या सरकारी धोरणाविरोधात न्यायिक लढा, 21 डिसेंबर 2019 चा शासन निर्णय, रिक्त केलेल्या अधिसंख्य पदांवरील भरती, 15 जून 1995 सारखा जातचोर बोगस आदिवासींना सेवासंरक्षण देणारा मुळ शासन निर्णय (जी.आर) रदद् करणे, 21 आक्टोबर 2015 चा शासन निर्णय रदद् करणे, पेसा भरती, राज्यातील अनुसूचित जमातीच्या रिक्त पदांवर आदिवासी बेरोजगार तरूणांना संधी मिळावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका, अधिसंख्य पदावरील जातचोरांना दिलेले सेवाविषयक लाभ काढून घेण्यासाठी याचिका अनुसूचित जमातीची राज्यात 12,500 आणि 55,687 पदे रिक्त असल्याची माहिती सर्वासाठी जाहिर करणे इत्यादी व असे अनेक यशस्वी प्रयोग आफ्रोटने आपल्या प्रोत्साहनाने केले. सूसज्य 'आफ्रोट चेंबर' चे नागपूर येथे उभे होणे, त्यात किमान नागपूर येथे दूरवरून येणाऱ्या आगंतूकांसाठी थांबण्याची सोय, रूग्नसेवेसाठी ॲम्बुलन्स अशी वैगेरे.. बरीच उपलब्धी सोबत घेउन संघटनेची वाटचाल संथगतीने होत आहे. आफ्रोट ही आदिवासींच्या प्रश्नावर काम करणारी संघटना म्हणून महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर सर्वदूर परिचित (विशेषत: जातचोर बोगस आदिवासींमध्ये) असली तरी नेमक्या आदिवासी समुहात संघटनेची व्याप्ती पाहिजे तसी मला अध्यक्ष म्हणून करता आली नाही, मात्र स्वतःहून संघटनेशी जुळणारे व संघटनेने केलेल्या कामावर मनस्वी प्रेम करणारे अनेक लोक भेटले. युवा तरूण-तरूणींचा त्यात नक्कीच वाटा आहे. कुरखेडयाचे वैष्णव-कालींदा काटेंगे, रामटेकचा अमित तुमडाम, प्रवीण उईके, औरंगाबादचा रिसर्चर अनीस तडवी, प्रा. स्वप्नील कुमरे, कु. आशा गुलशेर तडवी, सलीम तडवी, अस्लम तडवी, देवानंद मुरमुरे, पंकज पारधी, हेमंत भलावी, गजानन डाखोरे, राम ठोंबरे, अर्जूनी मोरगांवच्या कल्पना मसराम असे असंख्य लोकं संघटनेशी मनाने जुळले...आणि ते इतरांना जोडत आहेत...! आपण सर्व सुज्ञ आहात....पण, ‘‘संघटनेचा मला काय फायदा’’ असा एककल्ली विचार करणारे, विनाकारण फुकट सल्ला देणारे गृहस्थही आदिवासी समाजात कमी नाहीत, संघटनेने समाजाला व त्यांना स्वतःला मिळवून दिलेल्या अप्रत्यक्ष फायदयापासून ते अनभिज्ञ असतात... आफ्रोट जिल्हा आणि तालुका शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आफ्रोट संघटनेचे दरवर्षी सदस्यत्व जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच कायम असते. प्रत्येक वर्षाला रू 660/- (रू.सहाशे साठ) ofrot संघटनेच्या खात्यात -(AC No.- 60188009068 IFSC- MAHB0001321) जमा करून सदस्यत्वाचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे याची पूर्ण कल्पना आहे. त्या अनुषंगाने त्यांनी वैयक्तिक पातडीवर प्रयत्न करून सदस्य संख्या वाढवावी. आदिवासी बेरोजगार तरूणांना संघटनेचे सदस्यत्व घ्यायचे असल्यास रू 90/- (रू नव्वद) आणि नव्याने सदस्यत्व घ्यायचे असल्यास रू 750/- (रू.सातशे पन्नास)www.ofrot.org.in या वेबसाईटवर मेंबरशिप या ऑप्शन मध्ये जाऊन ऑनलाइन अदा करून ते प्राप्त करता येईल. कृपया आपण सदस्यत्व घेतल्यावर किंवा आपले सदस्यत्व नूतनीकरण केल्यावर आपण 9422163809 (राजेंद्र मरसकोल्हे) 9130337382 (नंदकिशोर कोडापे) 9326930019(महेंद्र उईके)9422812562(मनोज जुमनाके)7887894230(जी एम साखरकर) किंवा 8149774808(नितेश शिडाम)यापैकी कोणत्याही व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा...आपणा सर्वांना नववर्ष -2026 च्या खूप खूप शुभेच्छा...! आपले. राजेंद्र मरसकोल्हे(अध्यक्ष) व नंदकिशोर कोडापे(सचिव), आफ्रोट महाराष्ट्र.

About

Welcome to the official website of the Organization For Rights of Tribal (OFROT) - a pioneering Trade Union dedicated to safeguarding the constitutional rights of Scheduled Tribes in the state of Maharashtra. Founded in 2014 by the visionary Adv Rajendra Maraskolhe, OFROT has emerged as a formidable force for justice and equality. Our work is centered around advocacy, organizing, and collaboration to ensure that the interests of the tribal community are taken care of. We have worked tirelessly in our efforts to protect the rights of the Scheduled Tribes. Our goal is to be a strong and reliable voice for the tribal community. We invite you to join us in our mission to safeguard the constitutional rights and uphold the dignity of Scheduled Tribes in Maharashtra.


IMG-20200531-WA0862.jpg

Contact Us

Head Office

70 "OFROT CHAMBER" Tawkkal

Co-Operative Housing Society

Behind Dominos Pizza,Koradi Road

Post Mankapur,Nagpur-440030

Maharashtra   

Contact

orgtribal@gmail.com

Office :-

+917414943750

+917721954195

Adv.Rajendra Maraskolhe:- 

+9194221 63809

Opening Hours

Mon - Sat

11:00 am – 8:00 pm

  • Youtube

2026 Created  by  SSK 

©2026 Copyright by OFROT

FAQ I Privacy Policy I Terms and Conditions 

bottom of page